मुंबई/अहमदाबाद :- गुजरातमधील रेल्वे संरक्षण दलाने मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेसची (Vande Bharat Express Accident) धडक बसलेल्या म्हशींच्या मालकांविरुद्ध गुन्हा (FIR Against Owners Of Buffaloes Hit By Train) दाखल केला आहे. म्हशींच्या धडकेमुळे ड्रायव्हर कोचच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
काल सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमाराला या गाडीची अहमदबाद जवळ म्हशींच्या एका कळपाला धडक बसली. त्यात चार म्हशी ठार झाल्या आहेत. अहमदाबाद मधील वाटवा आणि मणिनगर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली.
त्यावेळी ही गाडी गांधीनगरकडे जात होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या म्हशींच्या मालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या भागात अनधिकृतपणे प्रवेश करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे, त्याचा आधार घेत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.