वाघोली – हवेली महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी वाघोली ग्रामपंचायतीच्या सदस्या वंदना दाभाडे यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.
वाघोली तालुका हवेली येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 महिलांना हवेलीत उपाध्यक्ष,सरचिटणीस, संघटक सचिव, कार्यकारणी सदस्य, अशी पदे प्रदान करण्यात आली. यावेळी
पुणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष शोभा हरगुडे, हवेली तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे,माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील, सरपंच ललिता आव्हाळे,माजी ग्रामपंचायत सदस्या सुनंदा दाभाडे,वसुंधरा उबाळे, कुंदा सातव, प्रियंका कोलते,जयश्री दाभाडे,अलका दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.