हॉटेल चालकाकडे खंडणी मागत वाहनांची तोडफोड

पुणे(प्रतिनिधी) – हॉटेल चालकाकडे खंडणी मागत कार आणी बुलेटची तोडफोड करण्यात आली. ही घटना विमाननगर येथील साकोरेनगर येथे घडली. याप्रकरणी आठ जणांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचे येरवडा परिसरात हॉटेल आहे. यातील आरोपींनी फिर्यादीच्या मामाच्या मुलास मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्याचा मित्र आरोपींकडे गेले होते. यावेळी आरोपींनी त्यांना सणासाठी पाच हजार आणी दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्यावर जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांना लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

यानंतर त्याच्या डोक्‍यात लोखंडी रॉड टाकत जबर मारहाण केली आहे. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेलवर जाऊन तेथील कार,बुलेट आणी सामानाची तोडफोड केली. यामध्ये फिर्यादीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बलभिम ननवरे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.