बहुजन वंचित आघाडीचा कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा

बावडा – जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गट पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांना यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही पाठिंबा जाहीर करण्यात आला. बावडा (ता.इंदापूर) येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये सर्वानुमते कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्यावर एकमत होवून पाठिंबा जाहीर करण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या मते सदर निवडणूक ही उत्साहाची नसून रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची होत आहे. त्यामुळे भावनिक असलेल्या निवडणुकीत आम्ही आमचा उमेदवार देणार नाही, असे जाहीर करण्यात आले. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद चीतारे, जिल्हा सचिव विकास कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रा. सतीश जगताप, सचिव अमोल भोसले, सह सचिव लखन भोसले, बावडा शहर अध्यक्ष अण्णा कांबळे, राष्ट्रवादीचे अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, मयुर सिंह पाटील, मनोज पाटील, सरपंच किरण पाटील आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.