बीड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. त्यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान आंबेडकरांना मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
का दिला राजीनामा?
लोकसभेनंतर झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बैठकीत वितरीत करण्यात आलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र बोगस असून ती रद्द करण्यात यावीत, अशी असंविधानिक मागणी शासनाकडे करण्याचा राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याने मला सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत आसल्याने मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोण आहेत अशोक हिंगे?
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोक हिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला करुन पक्षाकडून बीड विधानसभेची निवडणूक लढवली. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यामुळे त्यांच्या वर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी बीडमध्ये ‘वंचित’च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.