अकोला – अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज जाहिर करण्यात येत असून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जिल्हातील निवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा १४ पैकी १० जागांचा निकाल लागला असून त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद 11 पैकी पाच जागांवर वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर अपक्ष गटाला आणि राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी, आघाडी उमेदवारीची नावे खालील प्रमाणे
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना, 2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित, 3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष, 4) अंदूरा : मीना बावणे : वंचित, 5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी, 6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष, 7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित, 8) बपोरी : माया कावरे : भाजप, 9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित, 10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 01
भाजप : 01
एकूण जागा 14 जागांसाठी ही निवडणुक लढविण्यात आली असून त्यापैकी 10 जागांचा निकाल जाहीर झाला आहे.