वनाज-चांदणी चौकापर्यंत मेट्रो विस्तारणार

साडेतीन किमी अंतर : आराखड्यासाठी स्थायी समितीची मान्यता

पुणे – पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचा विस्तार वनाजपासून पुढे चांदणी चौक (शिवसृष्टी) पर्यंत करण्यात यावा, तसेच यासाठीचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने तयार करावा, या प्रस्तावास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यास समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर कोथरूड येथील कचराडेपो जागेवर डेपो आणि शिवसृष्टी हे दोन्ही प्रकल्प प्रस्तावित होत्या. त्यावर तोडगा काढत राज्यशासनाने कचरा डेपोची जागा महामेट्रोला देऊन येथील प्रस्तावित शिवसृष्टी चांदणी चौकातील बीडीपीच्या स. नं. 99 आणि 100 मध्ये प्रस्तावित केली. त्यामुळे आता हा मेट्रो मार्ग वनाजपासून चांदणी चौकापर्यंत न्यावा, अशी या मागणी करण्यात येत होती. तसेच महामेट्रोनेही या पूर्वीच हा मार्ग विस्तारीकरणाचे संकेत दिले होते. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा चांदणी चौक हा महत्त्वाचा असून येथे सर्व प्रकारच्या परिवहन सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी मेट्रोचे स्थानक झाल्यास हिंजवडी, मुळशी, पाषाण, वारजे भागातील नागरिकांना शहरात इतरत्र जाण्यासाठी महत्त्वाचे वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे याचा प्रकल्प अहवाल लवकरात लवकर करण्यात यावा, असा प्रस्ताव देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)