लो ब्लड प्रेशरसाठी मोलाच्या टिप्स

रक्तदाब कमी केव्हा होऊ शकतो?

-बराच काळ झोपून असल्यास (बेड रेस्ट असल्यास) आणि अचानक उठून बसल्यास
गरोदरपणात साधारण पहिल्या आठवड्यामध्ये
खूप रक्तस्त्राव झाल्यास  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास

उच्चरक्तदाबासाठी उपचार सुरू असताना, हृदयासंबंधी, नैराश्‍यासंबंधी काही औषधे सुरू असताना, पार्किन्सन आजाराची औषधे घेत असताना
हृदयविकारांमध्ये, हृदयाच्या झडपांमध्ये बिघाड झाल्यास, हृदयविकाराचा झटका आल्यास
अंतःस्त्रावी ग्रंथींच्या आजारात उदा – हायपोथायरॉईडिसम, पॅराथायरॉईडचे आजार, ऍडिसन डिसीज, मधुमेह आणि रक्तशर्करा कमी होणे
तीव्र जंतूसंसर्ग
तीव्र ऍलर्जी

मज्जासंस्थेचे विकार
आहारात जीवनसत्व ब-12, फोलिक ऍसिड यांचा आभाव असणे
रक्तदाब कमी होणे हे आपल्या कल्पनेपेक्षा अधिक प्रमाणात सर्वसामान्यपणे दिसून येते. बहुतांशी हे गंभीर नसले आणि काही लक्षणे नसली तरी रक्तदाब नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे.

कमी रक्तदाबासाठी काय उपचार आहेत? 

हे सर्वस्वी त्यामागच्या करणावर अवलंबून आहे, पण तातडीने करता येण्याजोग्या काही गोष्टी आहेत-
पाय हृदयाच्या पातळीच्या वर येतील असे (पायाखाली उशी ठेवून) झोपणे

-द्रवपदार्थांचे सेवन करणे
-बराच काळ उभे रहाणे टाळणे
-बऱ्याच व्यक्तींमध्ये दीर्घकालीन कमी रक्तदाब जीवनशैलीत काही बदल करून सुधारता येतो.
कायम लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे, कमी रक्तदाब हा जास्तीच्या रक्तदाबापेक्षाही धोकादायक असतो.

रुग्णाच्या लक्षणांनुसार डॉक्‍टर पुढील उपाययोजना सुचवतात-
आहारातील मीठाचे प्रमाण वाढवणे, काळे मीठ व सैंधव मीठाचा वापर करणे
मद्य सोडून इतर द्रवपदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवणे (विशेषतः थंडी-तापाने आजारी असताना, हवामान गरम असताना)
मद्यपान कमी/बंद करणे
तुमची औषधे पाहून गरज पडल्यास ती बदलणे/बंद करणे
नियमित व्यायाम करणे

उठून बसताना/उभे रहाताना काळजी घेणे, सावकाश उठणे, उठण्यापूर्वी काही वेळ पायाची – घोट्यांची हालचाल करणे.
झोपून उठताना एकदम उभे न रहाता आधी पलंगाच्या कडेवर काही क्षण बसणे, मग उभे राहाणे.
पलंगाच्या डोक्‍याकडच्या भागाखाली विटा ठेवून तो भाग उंच करणे.
जड सामान न उचलणे.
स्वच्छतागृहात फार काळ न रेंगाळणे व फार जोर न देणे.
एका जागी फार काळ उभे न राहणे. दर 15-20 मिनिटांनी हालचाल करणे, चालणे.
फार काळ पाण्याच्या संपर्कात न राहता (शॉवरखाली, स्पा मध्ये). चक्कर आल्यास खाली बसणे. गरज पडल्यास अशा ठिकाणी खुर्ची ठेवणे.
एकावेळेस कमी खाणे. आहारातील कर्बोदके कमी करणे. खाल्ल्यानंतर जरा विश्रांती घेणे. उच्चरक्तदाबाचे उपचार सुरू असतील तर खाण्याआधी गोळ्या न घेणे.
गरज भासल्यास पोटऱ्या आणि मांड्यांना आधारासाठी इलॅस्टिक सपोर्ट वापरणे. यामुळे पायांकडचा रक्तप्रवाह व पर्यायाने रक्तदाब नियंत्रित राहातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.