मंचर, (प्रतिनिधी) – श्री भीमाशंकर येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पूर्वा वळसे पाटील यांनी पवित्र शिवलींगाचे जलाअभिषेक करून बुधवार, दि.२८ रोजी सकाळी दर्शन घेतले.
कळमजाईदेवी येथेही दर्शन घेतले. कळमजाईदेवीचे विश्वस्थ मारुती लोहकरे यांनी विकास आराखड्यात देवीचा गाभारा व कळसासाठी आणि शेजारील मोकळ्या जागेत सभागृह बांधण्यासाठी निधीची मागणी केली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंदिर आणि परिसर विकासासाठी निधी दिला जाईल, असे सांगितले.
प्रांत गोविंद शिदे, विशेष कार्यअधिकारी सारगं कोडोलकर, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वांळुज, सार्वजनिक उपविभागाचे अभियता सुरेश पठाडे,
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, भीमाशंकरचे अध्यक्ष सुरेश कौदरे, माजी सभापती संजय गवारी, प्रकाश घोलप, नदंकुमार सोनवले, यांच्या सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.