Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर बीडच्या कारागृहातच उपचार सुरू असून गेल्या तीन दिवसांपासून त्याला सलाईन लावण्यात आल्याचे समजते. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Walmik Karad) मकोका अंतर्गत गुन्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून वाल्मीक कराड बीड कारागृहात बंद आहे. (Walmik Karad) वारंवार प्रकृती बिघडल्याची तक्रार याआधीही वाल्मीक कराडने छातीत दुखणे, अशक्तपणा आणि इतर शारीरिक तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्याला अनेकदा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Walmik Karad) मागील काही दिवसांपासून लघवी करताना त्रास होत असल्याची तक्रार त्याने कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर कारागृहातच प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आणि त्याला सलाईन देण्यात आले. (Walmik Karad) संसर्ग झाल्याची चर्चा वाल्मीक कराडला ‘युरोसिस्टायटिस’ प्रकारचा संसर्ग झाल्याची चर्चा सुरू आहे. कारागृहात उपचार सुरू असूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. (Walmik Karad) दरम्यान, मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने कारागृहात जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली होती. बीड जिल्हा रुग्णालयात यूरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Walmik Karad)