#व्हॅलेंटाईन_डे : रतन टाटांनी सांगितली त्यांची अधुरी प्रेमकहाणी

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. अनेकदा प्राण्यांच्या फोटोंपासून ते प्रेरणादायक किस्से अशा अनेक गोष्टी शेअर करत आपल्या फॉलोअर्सना प्रेरणा देण्याचे काम करत असतात. त्यांच्या याच गोष्टीमुळे फॉलोअर्सनाही रतन टाटा काय पोस्ट करणार याची उत्सुकता लागलेली असते. आजही व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये आपल्या अधुरे राहिलेले प्रेमांबद्दल सांगितले आहे.

काय आहे पोस्ट?

लॉस एंजिल्स येथील कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी करत होते. १९६२ साल खूप चांगले होते कारण मला एका मुलीवर प्रेम जडले. त्याच मुलीसोबत लग्नही ठरले होते. परंतु, आजींची तब्येत खराब झाल्याने मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीनेही माझ्यासोबत भारतात यावे अशी माझी इच्छा होती. मात्र, त्यावेळी भारत-चीनचे युद्ध सुरु असल्याने तिच्या आई-बाबांनी नकार दिला आणि तेथेच तिच्यासोबतचे नाते संपले.

दरम्यान, सूरत येथे 28 डिसेंबर 1937 रोजी जन्म झालेले रतन टाटा यांचे पालन-पोषण त्यांच्या आजी नवजबाई यांनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.