मुंबई – आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच निमित्ताने बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात.
बॉलिवूडची नेहमीच चर्चेत असणारी जोडी म्हणजे, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी सुद्धा व्हॅलेंटाईन डे. निमित्त आपला एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या प्रेमी युगलांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, आणि फॅन्स सुद्धा त्यांच्या फोटो-व्हिडिओवर प्रचंड प्रेम करतात.
मालयकाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये मलायका अर्जुनच्या मिठीत दिसत असून, तो तिच्या डोक्याला किस करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीला उतरतोय. अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे अर्जुन कपूर याने सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या गर्लफ्रेंडला (मलायका) व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
“फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे प्रेम…’ असं म्हणत त्याने दिग्दर्शक इम्तियाज अली यांना मेंन्शन केलं आहे. बॉलिवूडमधली काही निवडक गाण्यांचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे. दरम्यान, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअप बद्दलच्या बातम्या प्रचंड चर्चेत होत्या. मात्र, या सर्व अफवा असल्याचे अर्जुन कपूर याने सांगितलं होत.
View this post on Instagram