“व्हॅलेंटाइन डे’की बात ही कुछ और है !

असं म्हणतात की, प्रेम ही अशी भावना आहे, जी व्यक्‍त होताच चेहरा खुलतो, मन मोहरून जाते. प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक वेळेची, जागेची गरज नसते. वर्षातील 365 दिवस प्रेमाचेच असतात; पण “व्हॅलेंटाइन डे’की बात ही कुछ और है! प्रेम नि:स्वार्थी, निखळ असावे. मात्र, अलीकडच्या काळात विविध घटनांमुळे हे प्रेम बदनाम होत आहे.

रोममध्ये “व्हॅलेंटाइन डे’ साजरा करायला सुरुवात झाली. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस सेंट व्हॅलेंटाइनच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोमन सम्राट क्‍लॉडियस द्वितीय याच्या काळात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी होती. प्रेम म्हणजे निव्वळ टाइमपास आहे, अशी या राजाची धारणा होती. प्रेम करणाऱ्यांचा त्याला राग असायचा.

सेंट व्हॅलेंटाइनने त्याला विरोध करून काही सैनिकांचे विवाह लावून दिले. क्‍लॉडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलीवर जडला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून व्हॅलेंटाइनला 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला लिहिलेल्या पत्राचा शेवट “युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

प्रेमाचा दिवस साजरा करण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिव्हलमधून याची खरी सुरुवात झाली. रोममध्ये फेब्रुवारी महिन्यात ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो, म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात “व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होतो. दैनंदिन जीवनात व्हॅलेंटाइनबाबत आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. “व्हॅलेंटाइन वीक’च्या निमित्ताने ती संधी निर्माण केली जाते. 14 फेब्रुवारी, “व्हॅलेंटाइन डे’ने जगभरातील तरुणाईला वेड लावले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी कुणाच्या प्रेमात पडत नाही, तरी वर्षभर याची तयारी सुरू असते.

प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षातील 365 दिवस असले तरी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला आता विशेष महत्त्व आहे. आजच्या तरुणाईला व्हॅलेंटाइन डेने भुरळ घातली आहे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून जरी याची ओळख झाली असली तरी या दिवसाला गालबोट लागू नये, याची खबरदारी तरुणाईने घेण्याची गरज आहे. प्रेम करायला कोणाचाच विरोध नाही; पण ते व्यक्त करण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. आपले मन स्वच्छ ठेवून नि:स्वार्थी प्रेम केले तर ते निश्‍चित यशस्वी होते. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालायचा असेल तर एकमेकांवर मनापासून प्रेम करा, हाच संदेश व्हॅलेंटाइन डेनिमित्त द्यावा.

असं म्हणतात की, प्रेम ही अशी भावना आहे, जी व्यक्‍त होताच चेहरा खुलतो, मन मोहरून जाते. प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक वेळेची, जागेची गरज नसते. वर्षातील 365 दिवस प्रेमाचेच असतात; पण “व्हॅलेंटाइन डे’की बात ही कुछ और है! प्रेम नि:स्वार्थी, निखळ असावे. मात्र, अलीकडच्या काळात विविध घटनांमुळे हे प्रेम बदनाम होत आहे.

रोममध्ये “व्हॅलेंटाइन डे’ साजरा करायला सुरुवात झाली. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस सेंट व्हॅलेंटाइनच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. रोमन सम्राट क्‍लॉडियस द्वितीय याच्या काळात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी होती. प्रेम म्हणजे निव्वळ टाइमपास आहे, अशी या राजाची धारणा होती. प्रेम करणाऱ्यांचा त्याला राग असायचा. सेंट व्हॅलेंटाइनने त्याला विरोध करून काही सैनिकांचे विवाह लावून दिले.

क्‍लॉडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव तुरुंगाधिकाऱ्याच्या मुलीवर जडला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून व्हॅलेंटाइनला 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली. फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला लिहिलेल्या पत्राचा शेवट “युअर व्हॅलेंटाइन’ असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. प्रेमाचा दिवस साजरा करण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिव्हलमधून याची खरी सुरुवात झाली. रोममध्ये फेब्रुवारी महिन्यात ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो, म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात “व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होतो. दैनंदिन जीवनात व्हॅलेंटाइनबाबत आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. “व्हॅलेंटाइन वीक’च्या निमित्ताने ती संधी निर्माण केली जाते. 14 फेब्रुवारी, “व्हॅलेंटाइन डे’ने जगभरातील तरुणाईला वेड लावले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी कुणाच्या प्रेमात पडत नाही, तरी वर्षभर याची तयारी सुरू असते.

प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षातील 365 दिवस असले तरी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेला आता विशेष महत्त्व आहे. आजच्या तरुणाईला व्हॅलेंटाइन डेने भुरळ घातली आहे. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून जरी याची ओळख झाली असली तरी या दिवसाला गालबोट लागू नये, याची खबरदारी तरुणाईने घेण्याची गरज आहे. प्रेम करायला कोणाचाच विरोध नाही; पण ते व्यक्त करण्याची पद्धत चांगली असली पाहिजे. आपले मन स्वच्छ ठेवून नि:स्वार्थी प्रेम केले तर ते निश्‍चित यशस्वी होते. एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालायचा असेल तर एकमेकांवर मनापासून प्रेम करा, हाच संदेश व्हॅलेंटाइन डेनिमित्त द्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.