पुणे – पुण्याची नवोदित टेनिसपटू वैष्णवी आडकरला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ज्युनिअर गटात पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. वैष्णवीने नवी दिल्लीत झालेल्या रोलॅंग गॅरोस ज्युनिअर वाइल्ड कार्ड सीरिज टेनिस स्पर्धेतील मुलींच्या एकेरीत विजेतेपदाचा मान मिळवला.
या स्पर्धेत बिगर मानांकित म्हणून सहभागी झालेल्या वैष्णवीने मुलींच्या एकेरीच्या अंतिम लढतीत संजना श्रीमलाचा 4-6, 6-4, 7-6 (3) असा पराभव केला. वैष्णवीला पॅरिसमध्ये होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या ज्युनिअर गटाच्या पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.