Firing Case : वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा परिसरात बेकायदेशीर वाळू तस्करीचा पुन्हा एकदा रक्तरंजित चेहरा समोर आला आहे. गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तस्करांच्या टोळीने बेदम मारहाण करत थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. (Firing Case) या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, गोळीबाराचा मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे हा श्रीरामपूर नगरपरिषदेचा अपक्ष नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दाभाडे हा चर्चित निलेश शेंडगे हत्या प्रकरणातील फरार आरोपी असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Firing Case) तक्रारदार शेतकरी शनिवारी रात्री आपल्या शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, गोदावरी नदीपात्रातून मोठा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पाहणी केली असता 10 ते 15 जणांचा जमाव दांडके घेऊन अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसले. (Firing Case) तक्रारदार दिसताच आरोपी विकास उर्फ विकी ढमके याने “तू आमचे लोकेशन महसूल आणि पोलिसांना सांगतोस का?” अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर टोळीने शेतकऱ्याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मदतीसाठी आलेल्या नातेवाईकांनाही धमकावत ढकलाढकली करण्यात आली. तक्रारीनुसार, याच गोंधळात अर्जुन दाभाडे याने बंदूक काढून “तुला नीलेश शेंडगेसारखे संपवतो,” अशी धमकी दिली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने अंधारामुळे गोळ्यांचा नेम चुकला आणि शेतकरी व त्यांचे नातेवाईक जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाले. (Firing Case) या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आणि हत्या प्रकरणात फरार आरोपी दुसऱ्या जिल्ह्यात खुलेआम फिरत असल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. स्थानिक पातळीवर या अवैध वाळू तस्करीला राजकीय संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा रंगली आहे. (Firing Case) या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Firing Case) गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा, संघटित गुन्हेगारी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता पोलिस आणि प्रशासन किती कठोर कारवाई करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Firing Case)