Vaibhav Suryavanshi World Record : आयसीसी अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप २०२६ मधील सुपर सिक्स फेरीतील रोमांचक सामन्यात (Vaibhav Suryavanshi World Record) भारत अंडर-१९ संघाने झिम्बाब्वे अंडर-१९ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना जबरदस्त सुरुवात केली. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. या सामन्यात भारतीय उपकर्णधार वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi World Record) आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आणि २४ चेंडूतच अर्धशतक झळकावले. सुरुवातीचा धक्का आणि वैभवची जबरदस्त खेळी भारतीय संघाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, आरोन जॉर्ज केवळ २३ धावांवर बाद झाला आणि संघाला ४४ धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी डाव सांभाळला. वैभवने आक्रमक फलंदाजी करत २४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. हे त्याचे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठरले (यापूर्वी बांगलादेशविरुद्ध ७२ धावा केल्या होत्या). वैभव ३० चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान अर्धशतक झळकावणारे फलंदाज विल मलाज्झुक (ऑस्ट्रेलिया) – २३ चेंडूत आयुष म्हात्रे (भारत) – २४ चेंडूत वैभव सूर्यवंशी (भारत) – २४ चेंडूत वैभव सूर्यवंशी (भारत) -३० चेंडूत बेन मेयस (इंग्लंड) – ३२ चेंडूत Vaibhav Suryavanshi World Record भारतीय संघाची मजबूत स्थिती वैभवच्या या स्फोटक खेळीमुळे भारताने पॉवरप्लेमध्ये ९९ धावा केल्या. नंतर कर्णधार आयुष म्हात्रे (२१ धावा), अभिग्यान कुंडू (६१ धावा) आणि वीहान मल्होत्रा ( १०९* धावा) यांच्या योगदानाने भारताने ५० षटकांत ३५२/८ धावा केल्या. हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. वैभव सूर्यवंशीची ही खेळी त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे दर्शन देते. १४ वर्षीय या खेळाडूने स्पर्धेत आपली छाप पाडली असून, भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी तो एक मोठी आशा आहे. आगामी सामन्यात देखील त्याचा हा फॉर्म कायम रहावा अपेक्षा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. हे पण वाचा : टॉप 2 मध्ये असूनदेखील मुंबई फायनलमध्ये पोहोचणार नाही? जाणून घ्या एलिमिनेटरचं समीकरण!