वडगाव-सांगवी रस्त्याला ‘गती’

ग्रामस्थांमध्ये समाधान : आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार

वडगाव मावळ – स्थानिक शेतकऱ्यांच्या गैरसमजामुळे ऑक्‍टोबर 2018 पासून सुरू असलेल्या वडगाव-सांगवी रस्त्यावरील खापरे ओढ्यावरील लांबी 21 मीटर व रुंदी 7.5 मीटरचा पूल व केशवनगर रेल्वे गेट ते सांगवी 2.65 किलोमीटर रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले होते. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून रखडलेले त्वरित सुरू केले. आमदार सुनील शेळके यांनी रखडलेल्या काम सुरू केल्याने ग्रामस्थांनी संधान व्यक्‍त केले.

वडगाव नगरपंचायतीला जोडणाऱ्या वडगाव-सांगवी रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम आहे. हे बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने 56 वर्षांपूर्वी केले होते. हा पूल अतिजीर्ण धोकादायक झाला होता, तसेच रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व वाहन चालक जीव धोक्‍यात घालून या पुलावरून प्रवास करीत होते. पूल व रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी ग्रामस्थांकडून
होत आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 2 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीतून खापरे ओढ्यावरील नव्या पुलाची लांबी 21 मीटर व रुंदी 7.5 मीटर व केशवनगर रेल्वे गेट ते सांगवी 2.65 किलोमीटर रस्ता आदी काम मंजूर झाले. ऑक्‍टोबर 2018 मध्ये या कामाला सुरुवात केली होती. पुलाचे व रस्त्याचे काम जून 2019 पर्यंत पूर्ण होणार होते. पण स्थानिक शेतकऱ्यांच्या गैरसमजामुळे त्यांनी विरोध केल्याने काम रखडले होते.

पावसाळ्यात सांगवी ग्रामस्थांनी दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास केला. शेतकरी व ग्रामस्थांच्या सततच्या मागणीचा विचार करून आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि एक वर्षांपासून रखडलेले काम सुरू केले. सांगवीच्या ग्रामस्थांना पर्यायी रस्ता भगवान पगडे व दिनेश पगडे यांच्या पिक असलेल्या शेतातून रस्ता दिला आहे. रस्त्याचे काम मे 2020 अखेर रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे अभियंता निशिकांत धावारे यांनी दिली.

या वेळी कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शाखा अभियंता निशिकांत धावारे, नारायण मालपोटे, निलेश मराठे, नंदकुमार दंडेल, दिनेश पगडे, गणेश पगडे व सांगवी ग्रामस्थ व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.