मुंबई – छोट्या पडद्यावर लोकप्रिय मराठी अभिनेत्री ‘वर्षा दांदळे’ यांचा अपघात झाला आहे. अपघातात वर्षा यांना गंभीर दुखापत झाले असल्याचे स्वतः त्यांनी इंस्टाग्रामवरून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या संदर्भातील एक-दोन पोस्ट देखील त्यांनी शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
वर्षा दांदळे यांनी लिहिले आहे की, “मोठा अपघात. मनक्याला दुखापत झालीये. उजव्या पायालाही दुखापत झालीये, तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे..’ या आशयाची भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.
View this post on Instagram
वर्षा दांदळे नुकत्याच “पाहिले नं मी तुला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मालिकेत त्यांनी ‘वच्छि आत्या’चे पात्र साकारले होते. त्यांचे ही भूमिका आज ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.