Pune : साधना बँकेच्या सेवकांचे लसीकरण; आरोग्य विमाही उतरविला

हडपसर –  कोरोनाच्या काळातही बँकेतील सेवकांनी खातेदार व सभासदांना अखंड सेवा दिली आहे. त्यामुळे जागतिक योग दिनाचे औचित्य साधत साधना बँकेच्या सेवकांना लस देण्यात आली असून त्यांचा आरोग्य वीमाही उतरविण्यात आला आहे, अशी माहिती साधना सहकारी बँकेचे चेअरमन अनिल तुपे यांनी दिली.

येथील साधना सहकारी बँक व नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेतील सेवक व त्यांचे कुटुंबीय यांचे साठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात उपस्थित सेवक व त्यांच्या कुटुंबीयांना लस देण्यात आली.

संस्था कर्मचाऱ्यांच्या बळावर मोठी होत असते हे विसरून चालणार नाही. कोरोना महामारीच्या काळातही बँकेच्या प्रत्येक सेवकाने एक कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे. तेव्हा प्रत्येक सेवकांची काळजी बँकेने घेतली असून या पुढील काळात सेवकांच्या आरोग्य रक्षणासाठी व त्यांच्या कुटुंबिया करिता ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी, ग्रुप अक्सीडेंटल पॉलिसी, व वर्कसमेन कॉम्पेनसेशन पॉलिसी, स्टार हेल्थ अँड अलाईड कंपनी यांचेकडे विमा केला असून त्यापोटी विमा प्रिमियम रु. १ कोटी ०५ लाख २५ हजार इतकी दिला असल्याचे साधना बँकेचे चेअरमन अनिल रतनशेठ तुपे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.