पानमळा परिसरातील नागरिकांचे लसीकरण; जिव्हाळा सोशल फाऊंडेशनचा उपक्रम

पुणे – प्रभाग क्रमांक 30 मधील जिव्हाळा सोशल फाऊंडेशन, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठाण आणि निरामय संस्थेच्या वतीने या भागातील वस्तीमधील नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीमे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या भागातील नागरिकांना मास्कचे वाटपही करण्यात आले. जिव्हाळाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक राहूल तुपेरे यांच्या पुढाकारातून हे लसीकरण करण्यात आले.

यावेळी पानमळा,दांडेकर पूल,या भागातील एकही डोस न झालेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा मीरा तुपेरे, कुणाल वाघमारे, अनिकेत कांबळे, ऋषिकेश तुपेरे. हिराचंद वाघमारे,अतुल क्षिरसागर, यमुना म्हस्के,आणि निरामय चे डॉक्‍टर्स,अखिल पानमळा वसाहत मित्र मंडळाचे पदाधिकारी या लसीकरण मोहीचे संयोजन केले. तसेच ज्या नागरिकांना लस हवी असेल त्यांनी संस्थेच्या पानमळा येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.