वर्षाखेरीस देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण? केंद्र सरकारची ‘दिलासादायी’ माहिती

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान उपलब्ध होणार लसींचे 'इतके' कोटी डोस

नवी दिल्ली – देशभरात करोनावरील लसींची मोठी टंचाई जाणवत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने गुरूवारी दिलासादायी माहिती दिली.

त्यानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या 5 महिन्यांच्या कालावधीत देशात विविध लसींचे 216 कोटी डोस उपलब्ध होतील. ते देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास पुरेसे ठरतील.

नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी संबंधित माहिती दिली. चालू वर्षातील अखेरच्या पाच महिन्यांत कोविशिल्डच्या 75 कोटी आणि कोव्हॅक्‍सिनच्या 55 कोटी डोसचे उत्पादन अपेक्षित आहे. 

त्याशिवाय, बायोलॉजिकल ईचे 30 कोटी, झायडस कॅडिलाचे 5 कोटी, नोव्हाव्हॅक्‍सचे 20 कोटी, नाकावाटे दिले जाणारे 10 कोटी, जेनोवाचे 6 कोटी आणि स्पुटनिक-व्हीचे 15 कोटी डोस उपलब्ध होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

रशियन स्पुटनिकचा पहिला साठा पुढच्याच आठवड्यात भारतात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.