नवी दिल्ली – संपूर्ण देशभरात आतापर्यंत 11 कोटी 10 लाख 33 हजार 925 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात गेल्या तीन दिवसातच एक कोटीपेक्षा जास्त लोकांच्या लसीकरणाचा विक्रम करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी 25 लाखाहून जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेनुसार देशात रोज 45,000 कोविड लसीकरण केंद्र सुरू असतात. या केंद्रांच्या संख्येत मंगळवारी जवळपास 21,000 ची वाढ करण्यात आली असून ती 67,893 एवढी करण्यात आली होती.
लस उत्सवाच्या पहिल्या दिवशी 30 लाख डोस, दुसऱ्या दिवशी 40 लाख डोस आणि तिसऱ्या दिवशी 25 लाखाहून जास्त डोस देण्यात आले आहेत.