लसीकरणानंतरही दरवर्षी बूस्टर डोसही घ्यावा लागेल

विषाणू किती शक्तिशाली असेल हे माहीत नाही : डॉ. ह्यूटन

वर्ष 2020 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात “नोबेल पारितोषिक’ जिंकणाऱ्या तीन शास्त्रज्ञांपैकी एक डॉ. ह्यूटन यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलेले हे मुद्दे लक्षणीय आहेत. केवळ लस घतली म्हणजे विषय संपला असे नसून, लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती उत्तमच ठेवावी लागेल, शिवाय दरवर्षी या लसीचा बूस्टर डोसही घ्यावा लागेल, असे ते सांगतात. वाचूया अधिक…

कमीत कमी वर्षभर जगात सर्वांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागेल आणि मास्क तर आयुष्याचा भाग करावा लागेल. हा विषाणू श्वासातून प्रवेश करतो यामुळे हवा शुद्ध करत राहावी लागेल. लस ठीक आहे, मात्र विषाणूही नवे रूप धारण करत आहे. यामुळे सावध राहण्याची गरज आहे. लसीकरणानंतर दरवर्षी बूस्टर घ्यावा लागेल तेव्हाच संरक्षण होऊ शकेल. कोरोनावर विजय मिळवण्यात दोन वर्षे लागतील. यानंतरही आपल्याला आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवावी लागेल, म्हणजे नव्या आजारांशी लढता येईल.

इन्फ्लूएंझा विषाणूमुळे अशा आजारांचा आपल्याला सामना करावा लागेल. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूमुळे २ कोटी मृत्यू झाले होते. ते इन्फ्लूएंझा विषाणूचे एक उदाहरण आहे. आपल्यावर विषाणूचा हल्ला कधीही होऊ शकतो. विषाणू नेहमीच पक्षी वा प्राण्यांमध्ये आढळतो. प्राण्यांची खरेदी- विक्री होते त्या बाजारांमध्ये काळजी घ्यावी लागेल. वुहानमध्ये कोरोनाचा प्रसार असाच झाला होता. एक मोठा धोका वातावरण बदलही आहे. पर्माफ्रॉस्ट घटल्याने बर्फाखाली जमिनीत गाडलेले कोट्यवधी विषाणू सक्रिय होतील.

मी अजूनही जिवंत विषाणू जास्त धोकादायक समजतो, मात्र आपल्याला वातावरण बदलाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यावर लवकर तोडगा काढावा लागेल. यात विज्ञानाची मदत घ्यावी लागेल. जर विज्ञान मान्य केले नाही तर मग आपल्याला आजार व विनाशासाठी तयार राहावे लागेल. कोरोनाने जगाला अनेक धडे शिकवले आहेत. पहिला धडा- विषाणू वास्तवता आहे व खूप धोकादायक हाेऊ शकतो. म्हणून आपल्याला निसर्ग आणि आपल्या आरोग्याबाबत सावध राहायची गरज आहे. तसेच विषाणू संशोधनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून या क्षेत्रात श्रम व पैशाची सतत गुंतवणूक करावी लागेल. जेव्हाही महामारी येईल तेव्हा आपल्याला लस तयार करावी तर लागेलच. तिचा साठाही करावा लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.