पुण्यात एकूण 51 केंद्रांवर लसीकरण, वाचा तुमच्या घराजवळील केंद्र

पुणे  – शहरात एकूण 51 लसीकरण केंद्रांवर गुरूवारी लसीकरण झाले असून, त्यातील 13 केंद्र खासगी रुग्णालयातील आहेत. महापालिका आणि खासगीमधील केंद्रे शुक्रवारी वाढवण्यात येणार आहेत.

 

 

तिसऱ्या टप्प्यात सुमारे 10 ते 12 लाख लोकसंख्या “कव्हर’ करायची असल्याने लसीकरणाला वेग द्यावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ केली आहे. बुधवारी ती संख्या 30 होती गुरूवारी ती 51 झाली आहे. शुक्रवारी खासगीची 8 केंद्र वाढवण्यात येणार असून, ती संख्या 21 होणार आहे.

 

महापालिकेची लसीकरण केंद्रे

राजीव गांधी रुग्णालय – येरवडा, कमला नेहरू रुग्णालय – मंगळवार पेठ, बीजे मेडिकल कॉलेज, सुतार रुग्णालय- कोथरूड, गंगाराम कर्णे रुग्णालय- येरवडा, कळस रुग्णालय – विश्रांतवाडी, मालती काची रुग्णालय – भवानी पेठ, भानगिरे रुग्णालय – महम्मदवाडी, बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय – डायस प्लॉट, शिव शंकर पोटे रुग्णालय – सहकारनगर, बिंदु माधव ठाकरे रुग्णालय – कोथरूड, बारटक्के रुग्णालय – वारजे माळवाडी, नायडू रुग्णालय, मीनाताई ठाकरे – वडगावशेरी, सावित्रीबाई फुले- गुरूवार पेठ, कलावती मावळे रुग्णालय – नारायण पेठ, रमाबाई आंबेडकर – आंबिल ओढा, प्रेमचंद ओसवाल रुग्णालय – बिबवेवाडी, जनता वसाहत दवाखाना- जनता वसाहत, विलासराव तांबे – धनकवडी, थोरवे रुग्णालय – जांभुळवाडी, थरकुडे रुग्णालय – एरंडवणे गावठाण, सखाराम कोद्रे रुग्णालय – मगरपट्टा, अण्णासाहेब मगर रुग्णालय -हडपसर, सावित्रीबाई फुले रुग्णालय – कोंढवा, बालाजीनगर रुग्णालय – धनकवडी, वसंत मोरे रुग्णालय – सुखसागरनगर, मुरलीधर लायगुडे रुग्णालय धायरी, केजीएन रुग्णालय – मीठानगर, व्हीआयटी युगपुरूष छत्रपती रुग्णालय, शेवाळे रुग्णालय, इंदुमती खन्ना रुग्णालय,

 

खासगी रुग्णालये-

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय- एरंडवणे, इनलॅक्स बुधरानी रुग्णालय – कोरेगाव पार्क, औंध इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स – औंध, साईश्री रुग्णालय औंध, कृष्णा रुग्णालय- कोथरूड, राव रुग्णालय- बिबवेवाडी, शिवम मल्टिस्पेशालिटी रुग्णालय फुरसुंगी, गॅलेक्सी केअर रुग्णालय- कर्वे रोड, पवार मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, रांका रुग्णालय, सूर्या सहयाद्री रुग्णालय – कसबा पेठ, रायझिंग मेडिकेअर रुग्णालय – खराडी आणि रूबी हॉल क्लिनिक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.