10 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध : पहिल्यांदा लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक
पुणे – 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी पहिला डोस आणि 45 वर्षे वयोगटासाठी 111 लसीकरण केंद्रांवर सोमवारी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये 10 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिला डोस घेणाऱ्यांनी रात्री आठ वाजता कोविन ऍप किंवा आरोग्य सेतूवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर 22 मार्च 2021 पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या 20 टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार आहे.18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी (म्हणजे पहिल्यांदा घेणाऱ्या) सोमवारी 6 केंद्रांवर “कोवॅक्सिन’ लस देण्याचे नियोजन आहे.
“कोवॅक्सिन’चा पहिल्यांदा डोसची सहा केंद्रे अशी – कमला नेहरू रुग्णालय (500 डोस), राजीव गांधी रुग्णालय, येरवडा (500 डोस), आण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर (500 डोस), जयाबाई सुतार रुग्णालय, कोथरूड (500 डोस), मुरलीधर लायगुडे रुग्णालय, धायरी (500 डोस) आणि ससून रुग्णालय (200 डोस).
“कोवॅक्सिन’चा दुसरा डोस घेणारे आणि 12 एप्रिलपूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशा 45 च्या पुढील नागरिकांसाठी दहा ठिकाणी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध होणार आहेत. यात कमला नेहरू रुग्णालय, डायसप्लॉट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मालती काची, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, केदारीनगर येथील छत्रपती शाहू, मोहंमद वाडीतील भानगिरे दवाखाना, गोसावीवस्तीतील बिंदूमाधव ठाकरे, औंध कुटी रुग्णालय, शिवाजीनगर येथील संत रामदास शाळा, नगररस्ता गलांडे हॉस्पिटल.
22 मार्चपूर्वी “कोविशील्ड’ लसीचा डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना येथे लस मिळेल : एसआरपीएफ वानवडी (100 डोस), पोलीस शिवाजीनगर (100 डोस), येरवडा कारागृह (100 डोस), रेल्वे रुग्णालय, पुणे स्टेशन (100 डोस). अन्य 97 रुग्णालयांमध्ये प्रत्येकी 100 “कोविशील्ड’चा डोस देण्यात येणार असून, त्यामध्ये 80 टक्के डोस हे दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहेत आणि 20 टक्के लस या 18 ते 44 वयोगटातील पहिल्यांदाच लस घेणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.