इंदापूरच्या आरोग्य विभागातील रिक्‍त पदे भरली

भरणे यांच्या पाठपुराव्याने आठ आरोग्य केंद्रांना दिलासा

पळसदेव – इंदापूर तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची पदे अनेक दिवसापासून रिक्‍त होती अनेक ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. त्यामुळे कामाचा मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांवर ताण होता. 

त्यात दुसऱ्या लाटेत अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा करून तालुक्‍यातील सर्वच पदे भरण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे तालुक्‍यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली.

इंदापूर तालुक्‍यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यात आली आहेत. बावडा, भिगवण, बिजवडी, कळस, लासुर्णे, निरवांगी,पळसदेव, सणसर, निमगाव केतकी अशा आठ केंद्रांवर प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप यांनी दिली.

फक्‍त नव्याने स्थापन झालेल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी देण्यात आला नाही. अनेक वर्षापासून सतत एका वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे एका अधिकाऱ्यावर कामाचा ताण येत होता. लसीकरण, करोनाची दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. त्यामुळे ही पदे भरण्यात आली आहेत.

सर्व ठिकाणची वैद्यकीय अधिकाऱ्याची पदे भरण्यात आल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. यामध्ये तालुक्‍यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात चार वर्षांनंतर प्रथमच एमबीबीएस डॉक्‍टरची नियुक्ती करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकारी ईशा बंगेरा यांची थेट नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांची नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांच्या कार्यतत्परतेमुळे तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.