उत्तराखंड : चामोली येथे हिमकडा कोसळून परिसरात महापूर आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. एसडीआरएफ (SDRF) चे 60 हून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्यांनुसार घडनास्थळी रवाना झाले आहेत. तसंच एनडीआरएफ आणि तीन टीम गाझियाबादहून एयरलिफ्ट करण्यात येत असल्याची माहिती NDRF कडून देण्यात आली आहे.
Teams of the State Disaster Response Force (SDRF) are already deployed in Joshimath. National Disaster Response Force (NDRF) has already moved from Dehradun to Joshimath. We are organising airlift for 3-4 more teams from Delhi to Dehradun onwards to Joshimath: SN Pradhan, DG NDRF https://t.co/DlvOVCEmXo
— ANI (@ANI) February 7, 2021
SDRF सतर्क असून अफवा न पसरवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अफवा न पसरवता केवळ सरकारी अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचं सांगण्यात आलं आहे. 200 हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू आहे.
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
दरम्यान, नंदप्रयागहून पुढे अलकनंदा नदीचा प्रवाह सामान्य होत असल्याची माहिती मिळत आहे. पाण्याचा प्रवाहही कमी होत असल्याची माहिती आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिद्धिमा अग्रवाल यांनी सांगितलं की, दोन्ही वीज प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 ते 150 लोकांबाबत माहिती नसल्याचं समोर आलं आहे. अचानक आलेल्या महापूरानंतर या लोकांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.