सर्व सरकारी अधिसूचनांमध्ये विक्रम संवतचा उल्लेख करा, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

डेहराडून – भारतीय नागरिकांसाठी देशाचे संपूर्ण पंचांग उपलब्ध आहे. या पंचांगासुनार चैत्र महिन्यातील पाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. आता याच पंचांगांचा वापर करुन उत्तराखंड सरकार, आपल्या प्रत्येक अधिसूचनेत विक्रम संवत आणि हिंदू महिन्याचा उल्लेख तारीख आणि वर्षासह करेल, असे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिले आहेत.
राज्यात जारी होणाऱ्या सर्व सरकारी अधिसूचना, राजपत्र अधिसूचना, उद्घाटन फलक आणि पायाभरणीमध्ये असे उल्लेख करण्याबाबत सरकार सजग असेल, असेही धामी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला तात्काळ आवश्यक आदेश जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. विक्रम संवत हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे, जो आपली शाश्वत ओळख आणि गौरवशाली इतिहास प्रतिबिंबित करतो. या उपक्रमामुळे सांस्कृतिक मूल्ये जपण्यास आणि नवीन पिढीला आपल्या समृद्ध वारशाशी जोडण्यास मदत होईल. तसेच भारतीय सण, त्यांची तिथी आणि इतर माहिती याद्वारे सर्वांना समजेल, असेही धामी म्हणाले.





