उत्तरप्रदेशला पुन्हा पावसाचा फटका ; 15 जणांचे बळी

लखनौ –  उत्तरप्रदेशला पुन्हा पावसाचा जोरदार फटका बसला असून त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये एकूण  15 जणांचा जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशात अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे 133 इमारती कोसळल्या आहे.या दुर्घटनेत अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, उन्नाव, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, लखीमपूर खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पीलीभीत, सोनभद्र, चंदौली, फिरोजाबाद, मऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच परिसराचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी, उत्तरप्रदेशमध्ये गेल्या तीन महिन्यात पावसाचा जोरदार फटका बसला असून 14 जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.