बांडा – उत्तर प्रदेशात पोलिसांनी छापा घालून बेकायदा शस्त्र निर्मितीचा एक बेकायदेशीर कारखाना उघड केला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे चिला पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार नरेंद्र प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला.
या छाप्यामध्ये 8 बेकायदेशीर शस्त्रे आणि शस्त्रनिर्मितीची उपकरणे जप्त करण्यात आली, असे सिंह यांनी सांगितले. रामकरण ऊर्फ गंगा, गुड्डा ऊर्फ भरत तिवारी, शिवम सिंह, अतिबल सिंह आणि पप्पू ऊर्फ फभुपत सिंह अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी या शस्त्रांचा वापर करण्याचे योजले होते, असे या सर्वांनी मान्य केले आहे. या सर्वांची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.