उत्तरप्रदेश पोलिसांनी तबलिगी शोधण्यासाठी जाहीर केले बक्षीस

लखनौ : तबलिगी जमातचे सदस्य शोधण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी आता बक्षीस जाहीर केले आहे. तबलिगींची माहिती देणाऱ्याला रोख 5 हजार रूपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय, संबंधित माहिती देणाऱ्याची ओळख उघड न करण्याची ग्वाहीही पोलिसांनी दिली आहे.
मागील महिन्यात दिल्लीत तबलिगी जमातचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला हजर राहिलेल्या अनेकांना करोना बाधा झाल्याचे समोर आले. मेळाव्यानंतर तबलिगी सदस्य देशातील आपापल्या राज्यांत परतले.

त्यांच्यामुळे देशातील करोनाबाधितांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतांश राज्यांत तबलिगींचा शोध घेतला जात आहे. त्यांना स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसे न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांनी दिला आहे. आता उत्तरप्रदेशने आणखी पुढचे पाऊल उचलताना बक्षीस जाहीर केले आहे. पुढे येण्याऐवजी अनेक तबलिगी सदस्य दडून राहिले आहेत. काहींनी त्यांचे मोबाईल फोनही बंद केले आहेत. त्यामुळे तबलिगींना शोधण्याचे मोठेच आव्हान अनेक राज्यांपुढे उभे राहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.