उत्तरप्रदेशात आता बाहुबलीचा दबदबा राहिलेला नाही – अमित शहा यांचा दावा

चित्रकुट – उत्तरप्रदेशात योगी अदित्यनाथ यांच्या सरकारने गुंडांचा चोख बंदोबस्त केला असून त्यामुळे आता येथील राजकारणात बाहुबलींचा दबदबा राहिलेला नाही असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. उत्तरप्रदेश आता बदलला आहे याची ही साक्ष आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशात महामिलावटीच्या आघाडीने बाहुबली उमेदवांरांना तिकीटे देऊन त्यांना पुन्हा प्रतिष्ठ देण्याचा प्रयत्न चालवला आहे पण त्याचा आता येथे काही उपयोग नाहीं कारण येथे आतो त्यांचे काही चालत नाही असे ते म्हणाले. येथे गुंडांना उलटे लटकाऊन सरळ केले जाते असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की ते महागठबंधनचे ते एक महामिलावटी नेते आहेत. देशात उन्हाळा सुरू झाला की ते विदेशात जातात. आणि ते नेमके कुठे गेले आहेत हे त्यांच्या मातोश्रींनाहीं समजत नाही. मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी साऱ्या देशातील जनतेची इच्छा आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.