नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच उत्तरप्रदेश दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांचे स्वागत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. यासंबंधीचा फोटो योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केला होता.दरम्यान, योगींच्या याच ट्विटची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.
मुख्यमंत्री योगींनी ट्विटमध्ये ,”शेषावतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या लखनऊ या पवित्र नगरीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिवादन.” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, याोगी यांच्या ट्विटमुळे लखनऊ शहराचे नाव बदलले जाणार कि काय ? अशी चर्चा सध्या सोशलमीडिया सुरु झाली आहे.
शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन… pic.twitter.com/zpEmxzS3OE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2022
योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘अयोध्या’ आणि अलाहाबादचे ‘प्रयागराज’ करण्याच्या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या होत्या. आता त्यांचे पुढचे ध्येय लखनऊचे नामांतर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे म्हटले जाते की, लखनऊचे नाव पूर्वी लक्ष्मणपुरी होते आणि नंतर ते बदलले गेले. लखनऊचे नाव बदलून ‘लक्ष्मणपुरी’ करण्याची मागणी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी वेळोवेळी केली आहे. त्याचाच विचार आता योगी आदित्यनाथ करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लखनऊच्या महापौर संयुक्त भाटिया यांनी लखनऊ महानगरपालिकेद्वारे गोमती नदीजवळ लक्ष्मणचा १५१ फूट उंच पुतळा बसवण्याची योजना आखली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे विद्यमान राज्यपाल योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळात कलराज मिश्रा यांनी लखनऊचे नाव बदलून लक्ष्मणपुरी करण्याची मागणी केली होती. हे सगळ्यांच्या मते झाले तर लोकांना जुन्या काळातील संस्कृतीशी जोडण्यास मदत होईल, असे ते म्हणाले होते.