योगी सरकारचा फैजाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा निर्णय; ‘हे’ असेल नवीन नाव

लखनौ – उत्तरप्रदेश सरकारने आता फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. आता या स्थानकाचे नाव अयोध्या कॅन्टोन्मेंट असे असणार आहे.

योगी सरकारने अलिकडच्या काळात अलाहाबादचे नाव प्रयागराज असे बदलले असून मुघलसराई रेल्वे स्थानकाचे नाव पंडित दीन दयाळ उपाध्यय जंक्‍शन असे ठेवले आहे.

अयोध्या येथे नवीन राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू असून त्या भागाचा मोठाच कायापालट करण्याची योजनाही उत्तरप्रदेश सरकारने आखली आहे. या परिसराला पुर्ण अयोध्यानगरीचे स्वरूप देण्यासाठी येथील फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा घाट उत्तरप्रदेशातील योगी सरकारने घातला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.