#ShoesForTheDM हॅशटॅगने उत्तरप्रदेशातील जिल्हाधिकारी ट्रोल

लखनौ : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भवानी सिंह हे सध्या सोशलमीडियावर ट्रेंड होत आहेत.  #ShoesForTheDM या नावाने सिंह ट्रोल होत आहेत. मागच्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी सोशलमीडियावर ट्रोल होत असून देश परदेशातील लोक त्यांना महागडे शुज, घड्याळ आणि गाड्या भेट म्हणून पाठवत आहेत. सिंह ट्रोल होण्यामागचे कारण म्हणजे त्यांनी दलितांविषयी केलेले वक्‍तव्य. दलित समाजाने त्यांच्याविरोधात मोहिम छेडत त्यांना फेसबुक, ट्‌वीटर आणि इंस्टाग्रामवर महागड्या शुजचे फोटो पाठवत आहेत.

बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह यांनी दलित नेत्यांच्या महागड्या गाड्या आणि बुटांवर वक्‍तव्य केले होते.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रामपुरच्या एका शाळेमध्ये भवानी सिंह यांना आपली महत्वाची बैठक सोडून जावे लागले होते. या शाळेमध्ये दलित विद्यार्थ्यांना एका कडेला बसवून मध्यान्ह भोजन देण्यात येत होते. हा व्हिडीओ बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ट्‌विट करून योगी सरकारवर निशाणा साधला होता. याच प्रकरणावरून सिंह शाळेत दाखल झाले होते. दरम्यान, शाळेच्या बाहेर बसपाच्या कार्यकर्त्यांना पाहूण सिंह यांनी 25 लाखाच्या गाड्या, 20 हजाराचे घड्याळ आणि 10 हजाराचे शुज घालून तुम्ही राजकारण करू नका असे म्हटले. त्यांच्या या वक्‍तव्यावरूनच त्यांना सध्या ट्रोल करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या विरोधात सोशलमीडियावर मोहिम छेडली असल्याचे दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)