नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिल आनंद सिंग बिष्त यांचे आज निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांचे आज निधन झाले असून ते ८९ वर्षांचे होते.
योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांवर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली. योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना १३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते उत्तराखंडमध्ये राहत होते. तसेच १९९१ मध्ये ते फॉरेस्ट रेंजर या पदावरून निवृत्त झाले होते.