उत्तरप्रदेशात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार

वयोवृद्ध दाम्पत्यास दिले 1.28 अब्ज रु.चे वीज बिल

हापूर : उत्तरप्रदेशात सध्या महावितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार उघड झाला आहे. कारण महावितरणकडून एका वयोवृद्ध दाम्पत्यास चक्‍क 1.28 अब्ज रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. दरम्यान, एवढे बिल पाहून या दाम्पत्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे.

हापूर गावातील शमीम यांना महावितरण कंपनीकडून 2 किलोवॅटसाठी तब्बल 1.28 अब्जांचे वीज बिल दिले आहे. दरम्यान, एवढे बिल पाहून शमीम यांना धक्‍का बसला असून सध्या ते या बिलातील दुरूस्ती करण्यासाठी वीज बिल कार्यालयात चकरा मारत आहेत. यासंबंधी विचारपूस केली असता अधिकाऱ्यांनी याला तांत्रिक गडबड असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे शमीम यांनी या बिलावर प्रतिक्रिया देताना, आपल्याला महिन्याला जास्तीत जास्त 800 रू. बिल येते. परंतु, हे बिल पाहून आपण थक्‍क झालो असल्याचे म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.