भाजप आमदारावर पक्ष कार्यालयातच गोळीबार

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश येथील लखीमपूर मतदार संघातील भाजप आमदार योगेश वर्मा यांच्यावर आज पक्ष कार्यालयामध्ये होळी साजरी करताना गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असून, भाजप आमदार योगेश वर्मा हे पक्ष कार्यालयामध्ये होळी साजरी करत असताना त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात योगेश वर्मा यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले. कार्यालयामध्ये जमलेल्या इतर नेते मंडळी तथा कार्यकर्त्यांनी वर्मा यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे. वर्मा यांची प्रकृती आता धोक्यातून बाहेर असल्याचे लखीमपूरच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1108679831577939969

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)