UP Road Accident: उत्तर प्रदेशातील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कन्नौज जिल्ह्यात घडली. डबलडेकर बस आणि ऑईल टँकरमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बस आणि टँकरने लगेच पेट घेतला.
वेग जास्त असल्याने हा अपघात –
या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसचे नियंत्रण सुटून टँकरला धडक बसल्याचे बोलले जात आहे. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. या संपूर्ण प्रकरणावर कन्नौजचे एसपी अमित कुमार आनंद यांनी सांगितले की, या अपघातातील मृतांची संख्या 8 आहे, तर 19 जण जखमी आहेत.