ब्लेझिंग बॅशर्स फॅंटम स्टार्स दरम्यान सलामीची लढत

मुंबई – युटीटी मुंबई सुपर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला वरळीच्या एनएससीआय येथे सुरुवात होत असून पहिल्या सामन्यात गतविजेता ब्लेझिंग बॅशर्ससमोर फॅंटम स्टार्सचे आव्हान असणार आहे.

बॅशर्स संघात रिगन अलबुक्‍यूरेक्‍यू आणि श्रुती अमृते सारखे स्टार खेळाडू आहेत व ते चांगल्या फॉर्मात देखील आहेत. त्यामुळे रविंद्र कोटीयनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फॅंटम संघासमोर आव्हान सोपे नसेल यासोबतच त्यांच्या ममता प्रभूकडे देखील नजरा असतील.लीगच्या पहिल्या दिवशी सहा टाय होतील. एमसीडीटीटीए आणि एमएसडीटीटीए यांच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सेनहोरा डिसुझाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गेल्या वर्षीचे उपविजेते कुल स्मॅशर्सचा सामना देखील गुरुवारी असेल. यासोबतच दिया देशपांडे व ध्रुव शाह यांचा सहभाग असलेल्या सेंच्युरी वॉरियर्सचा सामना दिपीत पाटील व देव हिंगोरने यांचा सहभाग असलेल्या वेस्ट कोस्ट रेंजर्स संघाशी होणार आहे.

संध्याकाळच्या सत्रात मधुरिका पाटकरचा सहभाग असलेला पिंग पोंग संघ देव श्रॉफ व सिद्धेश पांडे यांचा सहभाग असलेल्या सुप्रिम फायटर्सचा सामना करतील.फॅंटम आपल्या दुसऱ्या सामन्यात सनील शेट्टीचा सहभाग असलेल्या टॉपस्पिनर्सशी होणार आहे. तर, दिवसाच्या शेवटच्या सामन्यात एस संघाचा सामना दिया चितळेच्या पिंग पॅंथर्सशी होणार आहे.दिया ही लिलावातील सर्वात महागडी खेळाडू होती. त्यामुळे तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.