‘यूटीएस अॅप’मुळे रेल्वेही सुपरफास्ट

अनारक्षित तिकिटे काढण्यास प्रवाशांची पसंती


‘पेपरलेस’ होण्याच्या दृष्टीने रेल्वेचा यशस्वी प्रयत्न

पुणे – रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार “यूटीएस ऍप’द्वारे अनारक्षित तिकिटे काढण्यास प्रवासी पसंती दाखवत आहेत. अॅपद्वारे यावर्षी 44 हजार 266 प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली. यातून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला 5 लाख 77 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षभरामध्ये 980, तर महसुलामध्ये 920 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

अनारक्षित तिकीटे काढण्यासाठी प्रवाशांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र, प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने “यूटीएस अॅप’च्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करुन “पेपरलेस’ होण्याचे दिशेने देखील वाटचाल सुरू केली आहे. दि.4 एप्रिल 2018 पासून उपनगरीय स्थानकांसाठी, तर 12 ऑक्‍टोबर 2018 पासून अन्य स्थानकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली.

पुणे विभागाच्या वतीने विविध स्थानकांवर अॅपच्या वापराबाबत वारंवार कर्मचाऱ्यांनी जगजागृती अभियान राबविले होते. यामध्ये स्थानकांवर प्रवाशांना अॅप वापरण्याच्या प्रात्यक्षिकाद्वारे प्रक्रियेची माहिती दिली. याबाबत मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी वाणिज्य विभागातील कर्मचारी करण सिंह, एम.मुरली, एस.व्ही.सोना यांच्यासह पुणे, आकुर्डी, चिंचवड, खडकी, कासारवाडी, शिवाजीनगर आणि तळेगाव स्थानकांवरील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

असे घेता येते “यूटीएस अॅप’
– गुगल प्ले स्टोअर, विंडोज स्टोअर, अॅपल स्टोअरमधून “यूटीएस अॅप’ डाऊनलोड करावे.
– वापरकर्त्याने मोबाइल क्रमांकासह सर्व तपशील भरुन रजिस्ट्रेशन करावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.