पुणे स्थानकात “युटीएस ऍप’ मार्गदर्शन केंद्र

पुणे – प्रवाशांना अनारक्षित तिकीटे “युटीएस” ऍपद्वारे आरक्षित करणे सोयीचे जावे, यासाठी पुणे विभागाकडून विशेष जनजागृती अभियान घेण्यात येत आहे. या अंतर्गत पुणे स्थानकातील बुकींग कार्यालयाजवळ विशेष मदत केंद्र सुरू केले आहे.

या मदत केंद्रांवर वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून मोबाइलवर ऍप वापराबाबतचे प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन करण्यात आले. यासह पुणे विभागाकडून विविध स्थानकांत याबाबत सचित्र वर्णन करणारे फलक लावण्यात आले आहेत. वेळेच्या बचतीसह अनारक्षित तिकीटे आरक्षित करणारी “युटीएस’ ऍपची सेवा दि. 4 एप्रिल 2018 पासून उपनगरांतील स्थानकांत तर दि. 12 ऑक्‍टोबर 2018 पासून सर्व स्थानकांत सुरू केली आहे. या ऍपमुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करणे सोपे जात असून ऍपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

कसे सुरू करता येते ऍप
गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, ऍपल स्टोअरद्वारे “युटीएस ऍप’ डाऊनलोड करायचे.
वापरकर्त्याचा तपशिल भरून नोंदणी करायची.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.