भाजपात वचनबद्धता राहिली नाही – उत्पल पर्रीकर

पणजी – भाजपातून आता विश्‍वास आणि वचनबद्धता यासारखे शब्द संपले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी केली आहे.

उत्पल पर्रीकर म्हणाले, माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्‍वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्त्व होते. ही पक्षाची मूल्य होती. पण 17 मार्चनंतर दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. पक्षाने भलतीच दिशा पकडली आहे. कॉंग्रेसच्या 10 आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी उघडपणे पक्षावर तोफ डागली आहे. 17 मार्च रोजी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्यानंतर भाजप पूर्णपणे बदलला असल्याचे उत्पल यांनी अधोरेखित केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.