युटीलीटी व्हेईकल खेडजवळ घरसली; मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलले

रत्नागिरी – येथून जवळ युटीलीटी ट्रॅक व्हेईकल रुळवरून घसरल्याने रविवारी या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि दिवाणखवटी स्थानका दरम्यान सकाळी सहा वाजून 57 मिनिटांनी या वाहनाच्या पुढची चाके रूळावरून घसरली. त्यानंतर नियोजित वेळा पत्रकानुसार सहा गाड्या मार्गस्थ झाल्या. मात्र गोव्याकडे जाणारी तेजसर एक्‍सप्रेसचे वेळापत्रक बदलावे लागले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.