वास्तववादी आर्थिक उद्दिष्टे ठरवणे, हे यशस्वी गुंतवणूक करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असते. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयोगी ठरतील, असे योग्य गुंतवणूक पर्याय समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या दीर्घकालीन किंवा अल्पकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंड साजेसे ठरू शकतात, पण त्याचे यश कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडाची निवड केली आहे, त्यावर अवलंबून असते.
हे विचारात घेता, यूटीआय इक्विटी फंड ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते आणि योजनेचा निधी 11,900 कोटी रुपयांहून अधिक आहे व 12 लाखांहून अधिक गुंतवणूकदार आहेत (ऑक्टोबर 31, 2020 पर्यंत). यूटीआय म्युच्युअल फंडाचे हे उत्पादन कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे.
यूटीआय इक्विटी फंडाचे गुंतवणूक धोरण गुणवत्ता, वाढ व मूल्यांकन या तीन स्तंभांवर आधारित आहे. दीर्घकाळामध्ये उत्तम प्रगती करण्याची क्षमता असणाऱ्या आणि अनुभवी व्यवस्थापनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवर भर देण्याचे पोर्टफोलिओ धोरण आहे.
दीर्घकालावधीमध्ये उच्च रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई) किंवा रिटर्न ऑन इक्विटी (आरओई) देण्याची व्यवसायाची क्षमता गुणवत्तेतून अधोरेखित होते. उद्योगापुढे किंवा क्षेत्रापुढे आव्हानात्मक काळ असूनही उच्च आरओसीई व आरओई निर्माण करू शकणारे व्यवसाय खऱ्या अर्थाने उच्च गुणवत्तेचे असतात आणि म्हणून नेहमी त्यांच्या भांडवलाच्या खर्चापेक्षा सरस कामगिरी करतात. उच्च आरओसीई/आरओई असणारे व्यवसाय सक्षम कॅप-फ्लो निर्माण करू शकतात आणि हे कॅश-फ्लो आर्थिक मूल्य निर्माण करण्यासाठी स्रोत ठरतात.
व्यवसायासाठी दीर्घकालीन प्रगती वाढीतून अधोरेखित होते. फंड स्थिर व अंदाज करण्यायोग्य सेक्युलर प्रगती करणाऱ्या व्यवसायांना प्राधान्य देतात. सायक्लिकल व अंदाज न करण्याजोगी प्रगती असलेल्या व्यवसायांना विचारात घेत नाहीत. सायक्लिकल ग्रोथ व डी-ग्रोथ तीव्र असू शकतात व त्यांचा अंदाज वर्तवता येत नाही आणि अशी वाढ गुंतवणूकदारांना चांगला किंवा वाईट असा आश्चर्याचा धक्का देऊ शकते. सेक्युलर ग्रोथच्या बाबतीत मात्र दीर्घकाळ चालना देणारे घटक समजून घेण्यासाठी तुलनेने अधिक निश्चितता असते आणि त्यामुळे भविष्यातील परिणामांबद्दलही निश्चितता असते. उच्च गुणवत्ता असणारे व्यवसाय आर्थिक मूल्य निर्माण करतात, उच्च वाढीचे व्यवसाय हे आर्थिक मूल्य आणखी वाढवतात. याच कारणाने फंड स्टॉकची निवड करत असताना गुणवत्ता व वाढ यांची सांगड घालतो.
फंडाच्या गुंतवणूक धोरणाचा शेवटचा स्तंभ म्हणजे मूल्यांकन. कोणत्याही चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करायची असल्यास मूल्यांकन अतिशय महत्त्वाचे असते आणि म्हणूनच स्टॉक खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाने याचा बारकाईने अभ्यास करावा. व्यवसायाचे मूल्यांकन समजून घेण्यासाठी प्राइस टू अर्निंग्स (पी/ई) मल्टिपल येथून सुरुवात करणे योग्य ठरत असले तरी मूल्यांकनाची ही पद्धत योग्य प्रकारे समजून घेतली जात नाही व योग्य प्रकारे वापरली जात नाही.
अनेकदा उच्च आरओसीई व उच्च वाढ असणारा व्यवसाय नसला तरी उच्च पी/ई असते आणि तरीही येत्या काही महिन्यांता किंवा तिमाहींमध्ये काय सरस कामगिरी करेल, यापेक्षा व्यवसायाच्या मूलभूत बाबींचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही आकर्षक गुंतवणूक ठरू शकते. म्हणूनच, पी/ई कडे पाहून कोणत्याही निर्णयावर येण्यापूर्वी प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायाची वैशिष्ट्ये काळजीपूर्वक अभ्यासणे आणि त्यानंतर प्रत्येक व्यवसायासाठी योग्य मूल्यांकन ठरवणे आवश्यक आहे.
हा फंड गुंतवणुकीची ग्रोथ ही शैली अवलंबतो आणि बाजारातील सर्व मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो. ऑक्टोबर 31,2020 पर्यंत, योजनेची प्रामुख्याने, म्हणजे साधारण 41% गुंतवणूक बजाज फायनान्स, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बॅंक, एलअँडटी इन्फोटेक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फो-एज (इंडिया), इन्फोसिस, एयू स्मॉल फायनान्स बॅंक. यामध्ये आहे.
मूलभूत इक्विटी पोर्टफोलिओ विकसित करण्यासाठी आणि आर्थिक मूल्य देणाऱ्या दर्जेदार व्यवसायांतील गुंतवणुकीद्वारे भांडवलामध्ये दीर्घकालीन वाढ करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या इक्विटी गुंतवणूकदारांसाठी यूटीआय इक्विटी फंड साजेसा आहे. थोडक्यात, सांगायचे तर, मध्यम प्रमाणात जोखीम घेण्याची क्षमता असणारे आणि दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 5 ते 7 वर्षे गुंतवणूक करण्याची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा विचार करण्यात हरकत नाही.