युटीटी कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धा : सुरज चंद्रशेखरला तिहेरी मुकुट

मुंबई – सुरज चंद्रशेखरने युटीटी कॉर्पोरेट टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तीन गटात जेतेपद मिळवले. खार जिमखाना येथे रविवारी झालेल्या सामन्यात एचडीएफसी लाईफच्या या स्टार खेळाडूने गतविजेत्या मयुरेश केळकरला (इंडियन एक्‍सप्रेस) पुरुष एकेरीच्या लढतीत पराभूत केले. त्यापुर्वी त्याने मयुरेशसोबत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी व पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद मिळवले.

सुरजने उपांत्यपुर्व व उपांत्यसामन्यात चमक दाखवली.त्याच्यासमोर अंतिम सामन्यात मयुरेशने आव्हान होते. सुरजने सामन्याला चांगली सुरुवात करत पहिले दोन गेम 11-8, 11-9 असे जिंकले. तिस-या गेममध्ये सुरजकडे 10-6 अशी आघाडी होती. मयुरेशने तीन सलग गुण जिंकत आघाडी 10-9 अशी कमी केली. पण, सुरजने पुनरागमन करत जेतेपदावर आपले नाव कोरले.

35 वर्षांवरील गटात सुरज चंद्रशेखरने विजयी फॉर्म कायम ठेवत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने पहिल्या दोन गेममध्ये विजय मिळवत चमक दाखवली. शशांकने तिस-या गेममध्ये विजय नोंदवत पुनरागमन केले. सुरजने चौथा गेम आपल्या नावे करत दिवसातील आपले दुसरे जेतेपद मिळवले. तर, पुरुष दुहेरीत जेतेपद मिळवत त्याने विजेतेपदाची हॅटट्रीक साजरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.