मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांचा दबदबा आहे अशा ज्येष्ठ अभिनेत्री ‘उषा नाडकर्णी’ यांचा आज वाढदिवस! केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील उषा यांनी आपल्या अभिनयाचा उत्तम ठसा उमटवला आहे.
खाष्ट सासूसोबतच प्रेमळ आईचीही भूमिका त्यांनी विविध चित्रपटांमधून साकारली आहे. एक बिनधास्त आणि मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना आज ओळखले जाते.
उषा ताईंच्या अभिनय कारकिर्दीला 1979 साली सुरुवात झाली. जब्बार पटेल दिग्दर्शिक ‘सिंहासन’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी शांताबाईची भूमिका साकारली होती.
उषा नाडकर्णी यांचा 13 सप्टेंबर 1946 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांच मूळ गाव कर्नाटकतलं असून सदानंद कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांच नाव तर आई या शिक्षिका होत्या. उषाताईंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
उषा नाडकर्णी यांना मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमाणं ‘आऊ’ असं म्हणतात. आतापर्यंच्या सर्वच भाषेतील ‘बिग बॉस’च्या घरातील सर्वात ज्येष्ठ स्पर्धकाचा मान उषा नाडकर्णी यांना मिळाला होता. बिग बॉसच्या घरातील हा एक विक्रमच आहे.