मुंबई – करोना विषाणूच्या साथीमुळे सर्व देश 21 दिवस लॉकडाऊन केला गेला आहे. या स्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीजचे वेगवेगळे टॅलेंट समोर यायला लागले आहे. रोज कोणी ना कोणी घरबसलेल्या केलेल्या उद्योगाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करून हे सेलिब्रिटीज आपले कला कौशल्य पब्लिकपुढे सादर करत आहेत.
अशातच , लॉकडाउनमध्ये खेळाडूंना आपल्या कुटुंबाला दर्जेदार वेळ द्यायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही एकत्र वेळ घालवत आहेत. लॉकडाउनमध्ये, अॅमेझॉन प्राइमवर ‘पाताल लोक’ नावाची एक नवीन वेब सीरिज रिलीज झाली आहे. अनुष्का शर्माच्या प्रोडक्शनमध्ये बनलेल्या यावेब सीरिज रिलीजला यूजर्सकडून खूप पसंती दिली जात आहे.
ही वेब मालिका 15 मे रोजी रिलीज झाली आहे. रात्री ‘पाताल लोक’ पाहताना अनुष्काने तिचा एक फोटो पोस्ट केला होता, तिथे एक फोटो पाहून यूजर्सना हसू फुटले. अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोत ती कॅमेर्याकडे पाहून हसत आहे आणि ‘पाताल लोक’ वेब सिरीज टीव्हीवर चालू आहे आणि टीव्हीच्या खाली एक फोटो फ्रेम ठेवली आहे, जी विराट-अनुष्काच्या लग्नाचे स्केच आहे.
स्केचमध्ये विराट-अनुष्काचे हसरे चेहरे बनवण्यात आले आहेत. दोन्ही बाजूला दोन नर व मादी सुपरहीरो पुतळे देखील ठेवलेले आहेत. काही लोकांनी फोटो फ्रेमचे कौतुक केले तर काहींना हसू अनावर झाले. अनुष्काने तिच्या लिविंग रूममधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले,”आता प्रत्येकजण #PaatalLok पहात आहे. @Primevideoin वर स्ट्रीम होत आहे.”