मुंबई – अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. मिताली सोशल मीडियावर चाहत्याबरोबर नेहमीच तिच्या लाईफचे अपडेट शेअर करत असते. नुकताच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
सध्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे, तिने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
एका युजर्सने फोटोवर कंमेंट्स केली आहे की,’बाथरूम बांधता बांधता गवंडी पळून गेला… ते तसंच राहिलंय…” तर दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे,’बेचारा सिद्धार्थ कस सहन करत असेल मितालीला..’ अशी कमेंट केली आहे.
सिद्धार्थने केलेल्या या कमेंटवर मितालीने “इशारा समज आणि परत ये” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर तिचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होतेे.