अनेक यूजर्सची तक्रार असते की स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो. तस पाहता आजकाल लाॅन्च होणारे स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला असतो, पण तुमच्याकडे जर जुना स्मार्टफोन असेल आणि तो चार्जिंग होण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरून तुमचा स्मार्टफोन लवकर चार्ज होण्यासाठी मदत होईल. पण तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जर खराब असेल तर या ट्रिक्सचा उपयोग होणार नाही. यासाठी बॅटरी बदलणे हाच एकमेव पर्याय.
अनेक यूजर्स पूर्ण रात्र स्मार्टफोन चार्जिंगला लावून देतात. त्यांच असं म्हणणं असत की, स्मार्टफोन पूर्ण चार्जिंग होण्यासाठी फारच वेळ लागतो.अशा यूजर्सनी स्मार्टफोन चार्जिंग लावण्यापूर्वी या दोन ट्रिक्स वापरून पहाव्यात, यामुळ त्यांचा फोन लवकर चार्ज होण्यास नक्कीच मदत होईल. अनेकवेळा स्मार्टफोन रात्रभर चार्जिंग केल्यानं ओवरचार्ज होऊन ब्लास्ट झाल्याची प्रकरण तुम्ही ऐकली असतील, त्यामुळं फोन रात्रभर चार्जिंग करणं टाळवं.
१) एअरप्लेन मोड – स्मार्टफोन चार्जिंग करण्यापूर्वी एअरप्लेन मोडवर टाकल्याने स्मार्टफोनमधील मोबाइल नेटवर्क आणि इतर कनेक्टिविटी या आॅफ होतात, त्यामुळ बॅटरीचा वापर कमी होऊन बॅटरी लवकर पूर्णता चार्ज होते. मात्र बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर पुन्हा एअरप्लेन मोड काढण्यास विसरू नका.
एअरप्लेन मोडवर फोन ठेवण्यासाठी तुम्हाला सेटिग्संमध्ये जावे लागेल. त्याठिकाणी वायरलेस आणि मोबाइल नेटवर्क मध्ये एअरप्लेन मोड पर्याय दिसेल, तो इनबेल केल्यास एअरप्लेन मोड अॅक्टिव्ह होईल. किंवा सध्याच्या नवीन आॅपरेटिंग सिस्टमच्या फोनमध्ये वरच्या बाजूला नोटीफिकेशन टॅबमध्येच एअरप्लेन मोड चा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तिथूनही तुम्ही एअरप्लेन मोड इनबेल करू शकता.
२) स्मार्टफोन स्वीच करणे – स्मार्टफोन स्वीच आॅफ करून चार्जिंगला लावणे जास्त फायद्याचे ठरू शकते. स्मार्टफोन स्वीचआॅफ केल्याने फोनमधील सर्व कनेक्टिविटी आॅफ झाल्याने बॅटरीचा वापर होतच नाही, त्यामुळं स्मार्टफोनची बॅटरी अधिक वेगानं आणि नेहमीपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज होते.
-स्वप्निल हजारे